क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

भादली येथे माजी उपसरपंचाची धारदार शस्त्राने हत्या

जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न

जळगाव|खान्देश लाईव्ह न्यूज|
जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, आज सकाळी कानसवाडा गावात एक धक्कादायक घटना घडली. शिवसेना (शिंदे गट) चे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३५) यांचा अज्ञात तिघांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

आज सकाळी ८ वाजता युवराज कोळी हे घराबाहेर असताना, अचानक तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. धारदार चाकू आणि चॉपरने वार करून त्यांना जागीच ठार मारण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा खून नक्की कोणत्या कारणावरून झाला? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास पथके रवाना केली आहेत.

गुन्हेगारी वाढत असतानाच भर दिवसा झालेल्या या हत्येने जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button