आरोग्यजळगावताज्या बातम्यासंस्था

वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे जिल्हास्तरावर केंडल मार्च ; भारतीय संघटना FMRAI राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड नरेंद्र सिंह व आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत गाजरे यांची उपस्थिती

जळगांव | खान्देश लाईव्ह न्युज |
कंपन्या सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रतिनिधिकडून खंडणी वसूल करण्याची प्रथा औषध उद्योगात आधीपासूनच रुजली होती, आता तीने विक्राळ रूप धारण केलं आहे. सम्पूर्ण देशात एक बाजार एक टॅक्स म्हणजेच जी एस टी लागू झाल्यापासून बळी तो कान पिळी उक्ती प्रमाणे जो स्टॉकिस्ट जास्त डिस्काउंट देईल तो बाजारात वर्चस्व गाजवेलं ही पद्धत सुरु आहे. म्हणजेच जास्तीच डिस्काउंट देणारे स्टॉकिस्ट कोणत्याही राज्यात, जिल्ह्यात, शहरात, गावात विक्री करू शकतात, यातूनच ठराविक जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले स्टॉकिस्ट शेजारच्या, दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यात, शहरात औषध जास्तीच डिस्काउंट देऊन माल विक्री करण्याची पद्धती ही निर्माण झाली आहे.

या औषधांच्या काळे कारनामे करून लक्षांक (टार्गेट) पूर्ण करणारी व्यवस्था सर्रासपणे काम करते आहे, यातून इन्सनटीव्ह, विदेश दौरे असे लाभ मिळवत आहेत, तर काही अगोदरचा मोठा चंदा गाठण्यासाठी अशा माल प्रक्टिसचे बळी ठरतायेत.

हैद्राबादच्या एवढ्या 23 वर्षीय अखिलेशला आत्महत्येपर्यंत याच व्यवस्थेने पोचवलं

फार्मा कंपनीत लागलेल्या या एम.आर.ला नोकरी करताना ऑर्डर्स साठी कष्टाने कमावलेल्या पगारातून पैसे द्यावे लागायचे हे त्याला मान्य नव्हते. यापासून दूर जाण्यासाठी त्याने एक नव्हे तर दोन कंपन्या ही बदलल्या, भ्रष्ट मॅनेजर्स त्या दुसऱ्या कंपणीतही पोचायचे आणि संबंध वापरून अखिलेश ला जुना खंडणी हिशोब पूर्ण करण्यासाठी कंपनी सोडायला भाग पडायचे, अशा गैरव्यवहारात फसवल्या गेलेल्या अखिलेशच्या कोवळ्या मनावर जबरदस्त दडपण निर्माण केले गेले.त्यातूनच त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. अखिलेशची कहाणी एक वेगळी शोकांतिका नाही. अनेक फार्मास्युटिकल कंपन्यात, कर्मचारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी “समायोजन पैसा देण्याचा तीव्र दबाव सहन करतात. काही चुपचाप सहतात. काही बोनस किंवा इंसेंटिव्हच्या आशेने मानतात. इतर चुपचाप संघर्ष करतात.कॉपर्पोरेट नोकरीच्या संकरी गल्लीत, त्याच्या मृत्यूने एक दुःखद स्मरण करून दिले की अथक दबाव आणि शोषण कसे एका तरुण जीवनाचा नाश करू शकते.
आज उदाहरण जरी अखिलेश असला तरी असे चुकीचे, काळे धंदे करणारे मॅनेजर्स आणि या उद्योगतले त्यांचे संबंधीत सर्रासपणे फिरतायेत.
अखिलेशच्या आत्महत्येचा निषेध करतांना वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने देशभर जिल्हास्तरावर केंडल मार्च काढत असून, या उद्योगात असे चुकीच्या मागनि काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित व्यवसाईकांनी अशा प्रवृत्ती ना भीक घालू नये या मागणीसाठी आग्रह धरण्यात आला
जळगावमध्ये दिनांक ३० मार्च २०२६ सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी काव्य रत्नावली चौकात एम एस एम आर ए च्या सदस्यांनी कैंडल मार्च काढण्यात आला, सदर कार्यक्रमात अखिल भारतीय संघटना FMRAI राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉग्रेड नरेंद्र सिंह व आयएमएचे अध्यक्ष डॉ.शशिकांत गाजरे तसेच संघटनेचे सभासद उपस्थित होते, दिवंगत अखिलेशला श्रद्धांजली वाहिनात आली आणि कंपनीचा डीलर्स मार्फत व्यवस्थापनाला निवेदन पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button