जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजभवनात राणी काजल आदिवासी होळी नृत्य पथकाचा गौरव

नंदुरबार |११ जून २०२६|खान्देश लाईव्ह न्यूज |
भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबई येथील राजभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील राणी काजल आदिवासी होळी नृत्य आडगाव-कोटबाधणी पथकाचे प्रमुख पो. गौतम खर्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आदिवासी संस्कृती आणि लोककलेच्या जतनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार राजेश पाडवी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते पो. गौतम खर्डे यांना भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी लोककला परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राणी काजल आदिवासी होळी नृत्य पथकाला मिळालेल्या या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पथकाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button