सिद्धिविनायक विद्यालयाची १० वी च्या उज्वल निकालाची परंपरा कायम

दिनांक |८ मे २०२६|
|खान्देश लाईव्ह न्यूज |
जळगाव येथील जुन्या औद्योगिक वसाहत मधील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयाचा १०वी चा निकाल ९३.९३% एवढा लागला आहे.
पारस राजाराम कोळी या विद्यार्थ्याने ९१.८०.% गुण मिळवित विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे तसेच चौधरी भैरवी राजेश ९१.६०% द्वितीय, प्राची सुरेश सातव ९०% गुण मिळवून तृतीय आलेली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संचालक नगरसेवक डॉ. गौरवदादा चंद्रकांत सोनवणे आणि संचालिका डॉ.अमृता सोनवणे- जळगाव मनपा महिला बालकल्याण समितीच्या सदस्या यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.आर .पी खोडपे, गुलाब पाटील, शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते संस्था अध्यक्ष आमदार अण्णासाहेब प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता चंद्रकांत सोनवणे नगरसेवक डॉक्टर गौरव सोनवणे,डॉ. शंतनु भारद्वाज यांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक करून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.


