क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रॅक्टरखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; रावेर तालुक्यातील घटना

रावेर |
शेतातून तुर ट्रॉलीत भरून आणताना ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरच्या धुडाखाली दाबले जाऊन सुनील भिका कोळी (३९, रा अटवाडे, ता रावेर) या तरुण शेतकऱ्याचा जागीच अंत झाला. ही घटना अटवाडे शिवारातील शेतात रविवारी दुपारी दीड वाजता घडली.

किरण सोपान कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात मयताच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नितीन डामरे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button