जळगावताज्या बातम्यासंस्था

नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मध्ये शिक्षक संघटना ( जुक्टो )ची नवीन स्थानिक कार्यकारणी गठीत

खान्देश लाईव्ह न्युज | २८ सप्टेंबर २०२६|
आज दि.२८ रोजी बुधवारी, रोजी ठीक ३ वाजता हॉल नंबर -19 ला नूतन मराठा महाविद्यालयात जुक्टो संघटनेच्या स्थानिक नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष -प्रा.प्रवीण रामदास पाटील,उपाध्यक्ष प्रा.नीता रमेश कुसुंबे
सचिव पदी प्रा.चेतन भिकनराव निंबाळकर
सहसचिव- प्रा.गजानन भगवान देशमुख
खजिनदार प्रा. प्रशांत वसंतराव पालवे,
कार्यकारणी सदस्य प्रा.डीगंबर कमळाजी चव्हाण, प्रा.मच्छिंद्र अमृत सैंदाणे, प्रा.संदीप आबाजी पाटील,
प्रा.डॉ. हेमाक्षी संजयराव वानखेडे,प्रा.डॉ.लता गुलाबराव दाभाडे,प्रा.ज्योती दीपक चौधरी यांची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे तज्ञ संचालकपदी प्रा.संजय यादवराव बेहेरे,श्रीमती.प्रा.डॉ.नूतन रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रकारे नवीन कार्यकारिणी ही सर्वानुमते गठीत करण्यात आली.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपप्राचार्य प्रा.डी. वाय.पाटील तर निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक प्रा. व्ही. व्ही.पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी कला विभागाचे पर्यवेक्षक प्रा.डी.ए.पाटील आणि वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक प्रा.पी. बी.लोंढे व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन मराठा परिवाराचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ.श्री.एल. पी. देशमुख साहेब यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button