महाराष्ट्रराजकारण
महापालिका निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात
जळगाव | खान्देश लाईव्ह न्यूज|
जळगावसह राज्यभरात २९ महापालिकांसाठी काल मतदान पार पडले. तर आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी केली जात आहे. काही वेळात आकडे हाती येतील.
दरम्यान निवडणुकीआधीच जळगाव महापालिकेत 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या सहा जागांचा समावेश आहे. निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेने आधीच आघाडी घेतली आहे. शहरातील १९ प्रभागांच्या ३२१ उमेदवारांचे भवितव्य एकूण १२२ फेऱ्यांनंतर स्पष्ट होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हातात येतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. सर्वात आधी टपाली मतपत्रिकांची मोजणी होईल. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. मतमोजणीनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



