नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न

जळगाव, दि. १० फेब्रुवारी २०२६| खान्देश लाईव्ह न्यूज|भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय अर्थसंकल्प 2026 वर युवक-युवतींसाठी परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
परिचर्चेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील युवकांनी सहभाग नोंदवून कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, तंत्रज्ञान व युवक कल्याण क्षेत्रांतील अर्थसंकल्पीय तरतुदींवर आपली मते मांडली. येणाऱ्या काळात युवकांच्या सर्जनशीलता व मानसिक आरोग्यासाठी 2000 क्रिएटर्स लॅब व राष्ट्रीय मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट स्थापन करण्याच्या तरतुदींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
अर्थसंकल्प युवक-केंद्रित व विकसित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण असल्याचा सूर चर्चेतून निघाला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. आर. बी. देशमुख यांनी सहकार्य केले तर स्वयंसेवक कमलेश सोनवणे व चेतन पाटील यांनी परिश्रम घेतले.
