श्रीमंतयोगी फाउंडेशन तर्फे जिजाऊ नगर परिसरात होळी उत्सव संपन्न

जळगाव|खान्देश लाईव्ह न्यूज|
श्रीमंतयोगी फाउंडेशन तर्फे जिजाऊ नगर परिसरात
नागरिक एकत्र येऊन होळी उत्सव दरवर्षी साजरा करीत असतात. दुर्गुणांची होळी करण्याची शपथ यावेळी नागरिकांना देण्यात आली. होळीची पूजा करीत झाड संवर्धनाचा निर्धार सुद्धा यावेळी नागरिकांनी केला. जिजाऊ नगर परिसरात यावर्षी साजरी केलेली होळी आदर्शवत ठरली आहे. यावेळी पालापाचोळा व गोवऱ्या यांच्या साहाय्याने होळी पेटवण्यात आली.समाजाला जागृत करून बदलत्या परिस्थितीनुसार अशाप्रकारे होळी साजरी केली पाहिजे, यातून समाज आणि निसर्ग हित जपले जाईल, याचे उदाहरण देण्यात आले आहे.
होळी आपल्याकडे दोन दिवस साजरी केली जाते एक असते छोटी होळी ज्यामध्ये होलिका दहन केले जाते. पूजा विधीने होळी पेटवून पुरणपोळीचा नैवैद्य होळीला दाखवला गेला. लहान मुले यावेळी डफली वाजवून आनंद लुटला.यावेळी नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


