संस्थाजळगावधर्ममहाराष्ट्रराजकारण
वाघनगर येथे १९ रोजी शिव जयंतीनिमित्त कार्यक्रम
जळगाव |
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाघनगर आणि सकल मराठा समाज वाघनगर यांच्यातर्फे शिव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘एक वाघनगर एक शिवजयंती’ या संकल्पनेवर उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राकेश पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमात १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ ते १० या वेळेत शिवगीतांचा ऑर्केस्ट्रा, शिवरायांची महाआरती, शिव व्याख्यान, पोवाडे, लहान मुलांचे नृत्य, गायन आदी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नाशिकचे प्रसिद्ध ‘लाइट शो’ हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. त्यामुळे या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती समितीतर्फे करण्यात आले आहे.

