क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मॉ साहेब जिजाऊ जयंती सप्ताहाच्या निमित्ताने “उद्योग आधार भरारी कार्ड शिबिर”
उपक्रमांचा उद्देश महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेचा प्रचार

अमळनेर |
तेजस्विनी महिला बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि वाणी समाज महिला मंडळ अंमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मॉ साहेब जिजाऊ जयंती सप्ताहाच्या निमित्ताने “उद्योग आधार भरारी कार्ड शिबिर” आणि “डिजिटल साक्षरता क्रांतिकारी मिशन” हे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांचा उद्देश महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेचा प्रचार करणे, त्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे, तसेच उद्योग-व्यवसाय क्षेत्रात त्यांना स्वावलंबी बनविणे असा होता.
या वेळी जयश्री पाटील, रंजना केले, पुष्पा नेरकर, मालती नेरकर, प्राध्यापक रंजना देशमुख, ज्योती मराठे, अलणाताई अलई, सौ. हेमा नेरकर, स्वप्नाली अमृतकार, वनश्री अमृतकर, राजश्री नेरकर यांसह अनेक महिलांची उपस्थिती होती.
डिजिटल साक्षरता क्रांतिकारी मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा, व्यवसायासाठी महत्त्वाचे कौशल्ये कशी आत्मसात करावी, याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात केले. या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनाची नवी दृष्टी मिळाली आणि समाजात महिलांच्या सक्षमीकरणाचा ठसा उमटविण्यास मदत झाली.
