लासूर येथे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने बक्षीस वितरण
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती निमित्त उपक्रम

लासूर |
येथील महिला भगिनी आणि विद्यार्थीनी यांच्यासाठी विवाहित महिला गट व अविवाहित मुलीचा गट अश्या दोन गटात क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त त्यांच्या जिवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर त्यांच्या जिवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षाचे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे वतीने करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत उत्तम यश संपादन केलेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी माळी समाज मंगल कार्यालय लासूर येथे जळगाव येथील सिद्धिविनायक फॉउंडेशन च्या संचालका,सहसचिव डॉ अमृता सोनवणे व अमळनेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सचिव भारती चव्हाण यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी व सूत्रसंचालन सदस्य प्रेमराज शेलकर व आभार सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज विकास मंडळाचे संचालक मास्टर टेलर्स, युवक संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्र माळी, भुमेश्वर मगरे, पवन महाजन, महेश माळी, कल्पेश माळी, अमोल गंभीर, निलेश राजकुळे, आर.डी. महाजन, समाधान महाजन, राहुल मगरे, योगेश माळी तसेच युवक मित्र यांनी परिश्रम घेतले.


