कोळी समाज परिचय मेळावा संपन्न
जळगांव |
दर्यासागर सामाजिक संस्थेतर्फे रविवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आदिवासी कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा झाला. यात राज्यभरातून आलेल्या १६० पेक्षा जास्त विवाहेच्छुक युवक-युवतींनी आपला परिचय करून दिला.
कोळी समाज वधू वर मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते – करण्यात आले. कार्यक्रमाच्या 5 अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त – डीवायएसपी राजेंद्र रायसिंग हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे,
सेवानिवृत्त मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी, सेवानिवृत्त डीवायएसपी प्रदीप साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते. वधू-वर परिचय सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नोकरीच्या मागे धावू नका – लग्न जुळवताना सरकारी नोकरीची अपेक्षा न ठेवता मुलगा जर निर्व्यसनी
असेल, त्याचा व्यवसाय असेल, स्वभाव जुळत असेल तर लग्नाला होकार द्यावा, असे आवाहन आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी केले.
प्रास्ताविक रणजित सोनवणे यांनी केले. वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपक तायडे यांनी आभार मानले. दरम्यान पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. इच्छुक वधू-वरांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून सूची करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.


