जळगावकरिअरताज्या बातम्यामहाराष्ट्र
बाहेती महाविद्यालयातील विद्यार्थींनी आकांक्षा म्हेत्रे या खेळाडूला कांस्यपदक

जळगांव |
ॲड एस.ए.बाहेती महाविद्यालयातील आकांक्षा म्हेत्रे या खेळाडूने सायकलिंगमध्ये कांस्यपदक प्राप्त केले.
बाहेती महाविद्यालयातील इयत्ता 12 वी ची विद्यार्थींनी आकांक्षा म्हेत्रे हिने दोन कांस्यपदक पटकविले आहे. बारामती येथे आयोजित खेलो इंडिया वूमेन्स लीग (वेस्ट झोन) स्पर्धेत वूमेन मुलींच्या वयोगटात 14 किलोमीटर टाईम ट्रायल व 28 किलोमीटर मास स्टार्ट या सायकलिंग स्पर्धेत तिने हे दोन पदक पटकविले. आकांक्षाला प्रशिक्षक सागर सोनवण यांचे मार्गदर्शन लाभले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे बाहेती महाविद्यालयातील प्राचार्य अनिल लोहार व क्रीडा शिक्षक हरीष शेळके यांनी कौतुक केले.



