आदर्श पदवी महाविद्यालयातर्फे आज ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन
गडचिरोली १४ ऑगस्ट २०२५| खान्देश लाईव्ह न्यूज|
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालय विभागाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विद्यापीठ परिसरातून प्रारंभ करण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” आणि “हर घर तिरंगा.. घर घर तिरंगा” अशा घोषणांनी परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण केले.प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन दिले.अजाणतेपणी ध्वजाचा अवमान होऊ नये याबाबाची दक्षता घेणे विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून विशेष काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
रॅली विद्यापीठ परिसरातून कलेक्टर कार्यालय, पोलीस अधिक्षक, जिल्हा सत्र न्यायालय कार्यालय या मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवा निर्माण व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ.श्याम खंडारे,प्रा.अंतबोध बोरकर(रा.से.यो) कार्यक्रम अधिकारी,प्रा. मनिषा पिपरे,सुदर्शन जानकी,प्रा.प्रणिता चंदनखेडे,प्रा.अजय राठोड,प्रा.नितीन चौधरी,प्रा.ऋतिक कोहळे,प्रा.मंगेश कडते, प्रा.पंकज राऊत,प्रा.मनोज बिरहारी,श्री.प्रवीण गिरडकर तसेच कर्मचारी वृंद यांची उपस्थिती लाभली.
