आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणसंस्था
शासकीय महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे महाराष्ट्र दिन संपन्न

जळगाव,२ मे २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. जळगाव मध्ये राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला.
त्याच प्रमाणे महाराष्ट्र व कामगार दिना निमित्त शासकीय महिला व बाल रुग्णालय मोहाडी जळगाव येथे ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ. किरण बळीराम यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी डॉ. किरण बळीराम सोनवणे वैदयकीय अधीक्षक, डॉ.सुशांत सुपे निवासी वैदयकीय अधिकारी, डॉ. मनोज पाटील प्रशासकीय अधिकारी, डॉ.गुरुप्रसाद वाघ स्त्री रोग तज्ज्ञ, सहा.अधिसेविका श्रीमती संगीता शिंगारे, इतर डॉक्टर्स, अधिकारी, सिस्टर्स, कार्यालयीन कर्मचारी, स्टाफ,कक्षसेवक, सफाई कामगार व जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

