गावठी कट्टयासह एकाला एमआयडीसी पोलीसांनी केले जेरबंद
जळगाव|खान्देश लाईव्ह न्यूज| कुसुंबा परीसरात राहणाऱ्या तरुण हा गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना समजताच, लागलीच पोलिसांनी धाव घेऊन त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस, होंडा कंपनीची शाईन दुचाकी मिळून आली.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ८ मार्च रोजी एमआयडीसी पोस्टेकडील पोका. नितीन ठाकुर यांना गोपणीय बातमी मिळाली होती की, कुसुंबा परीसरात तुषार सोनवणे नावाचा एक व्यक्ती त्याचेजवळ गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. ही माहिती मा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली. त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोधपथकातील पोउपनि चंद्रकांत धनके, पोका छगन तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांना कुसुंबा परीसरात पाठवून बातमीची खात्री करून योग्य कायदेशीर कारवाई करण्यास सूचना दिल्या.
सदर पथक कुसुंबा हॉटेल पुष्पा नशिराबाद रोड कडे फिरत असताना बातमी प्रमाणे हॉटेल पुष्पा समोर एक व्यक्ती अंगात हळदी रंगाचा शर्ट घालून मोसा वर बसलेला दिसला. पथकाचे सदस्य त्याच्या जवळ जात असताना त्याने मोसा सह पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पथकातील पोलीस अंमलदारांनी शिताफिने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
त्यानंतर, त्याच्या नावाचा तपास घेतल्यावर त्याने आपले नाव तुषार अशोक सोनवणे, खेडी आव्हाणे असे सांगितले. बातमीच्या सत्यतेची खात्री झाल्यानंतर पथकाने त्याची अंगझडती घेतली. या अंगझडतीत त्याच्या उजव्या कमरेत एक गावठी कट्टा (किंमत २०,००० रुपये) आणि २००० रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस मिळून आले. त्याचबरोबर, ५०,००० रुपये किंमतीचा होंडा शाईन मोसा देखील सापडला. यामुळे एकूण ७२,००० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह तुषार सोनवणे याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक नितीन ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार सोनवणे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२०२५ आर्म अॅक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि चंद्रकांत धनके व पोना योगेश बारी करत आहेत.


