बांबू वर्कआउट फॅट लॉस स्पर्धेत संजय इंगळे प्रथम, ३३ दिवसात साडेसहा किलो केले वजन कमी

जळगांव|खान्देश लाईव्ह न्यूज|
पॅंथर स्पोर्ट्स क्लब आणि नेचर कॅफे यांच्या संयुक्त विद्यमाने एक फेब्रुवारी ते पाच मार्च यादरम्यान प्रशिक्षक विनोद अहिरे, पराग घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेचर कॅफे हॉलमध्ये बांबू वर्कआउट फॅट लॉस स्पर्धा घेण्यात आली. ज्या स्पर्धकांनी तीन किलो फॅट लॉस त्यांना कास्यपदक, चार किलो फॅट लॉस रजत पदक, पाच किलो फॅट लॉस सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये रोटरी क्लबचे सदस्य श्री संजय इंगळे यांनी साडेसहा किलो फॅट लॉस करून प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांना रोटरी क्लबचे अध्यक्ष एडवोकेट सागर चित्रे यांच्या हस्ते सुवर्णपदक व फिटनेस गॉगल देऊन गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, जळगाव शहराचे आमदार श्री राजू मामा भोळे, प्रतिभाताई शिंदे, डॉ. केतकी पाटील, डॉ. चंदन महाजन, डॉ. पूजा सोमानी, वैशाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये ज्या महिलांनी आपल्या संसारिक जबाबदारी सांभाळून समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्या महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये सु.ग.देवकर शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे, पत्रकार पल्लवी सोनवणे, पत्रकार धनश्री बागुल, जळगाव जिल्हा पोलीस बॉईज संघटनेच्या अध्यक्षा पूनम पांडव यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेत पारितोषिक विजेते पुढील प्रमाणे.
*सुवर्णपदक*
हर्षा सांगोरे, मीनल पाटील, सीमा देशमुख, जय मला राखुंडे, मनोज पाटील, संभाजी पाटील, अयाज मौसिन,प्रदीप पाटील, संजय मराठे कादिर शेख व.
*रजत पदक*
रेखा मराठे, रीना तडवी, उमा महाले, सुनील सुखवानी, तेजस भंगाळे, बापू धनगर, रितेश तायडे, जानकीराम पाटील, वैशाली बाविस्कर, बत्तीसे
कास्यपदक सरिता मोरे, नेहा राठोड, आशिष पाटील
पुढील सर्व स्पर्धकांना बांबू वर्कआउट प्रशिक्षक श्री विनोद अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले असून समारंभावेळी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील सर्व स्पर्धक सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान ख्वाजा मिया जवळील महावीर क्लासच्या शेजारी नेचर कॅफे हॉलमध्ये नियमित बांबू वर्कआउटचा सराव करत असतात. सर्व पारितोषिक विजात्या स्पर्धाकांचे समाजातून कौतुक होत आहे.

