संस्थाताज्या बातम्यामहाराष्ट्र

हेमलकसा येथे श्रमसंस्कार शिबिर

१५ ते २२ मे या कालावधीत आयोजन

गडचिरोली |दिवंगत बाबा आमटे व
दिवंगत साधना आमटे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात भारतभरातील युवकांसाठी १९६८ पासून आंतर-भारती श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येते. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात या शिबिराचे १५ ते २२ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

देशभरातील अनेक तरुण या शिबिराने प्रेरित झाले. या शिबिराने देशाला अनेक सामाजिक कार्यकर्ते दिले. शिबिराच्या निमित्ताने सहभागी होणाऱ्या सर्वांना डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटेंद्वारे गेली ५१ वर्षे आदिवासी बांधवांच्या विकासासाठी
सुरू असलेले कार्य जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणी आहे.
शिबिरासाठीची वयोमर्यादा १५ ते ४५ असून केवळ २५० शिविरार्थीना सहभागी होता येणार आहे. प्रवेशासाठी संकेतस्थळावर लिक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अडचण येत असल्यास ई-मेल, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधता येईल. निवड झालेल्या
शिबिरार्थीना ई-मेल, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कळवण्यात येईल. अंतिम तारीख ५ मार्च आहे. नोंदणीसाठी https://forms. gle/8 UmSZJbamrzYTd7V7 या लिंकवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सचिन मुक्कावार ७५८८७७२८५८, दीपक सुतार ८२७५०४७१९२ किंवा ई-मेल shramsanskar2025@gmail.co m किंवा संकेतस्थळ lokbiradariprakalp.org येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button