परप्रांतीय व्यक्तीची खोटी रत्ने विक्रीचा प्रयत्न फसला
जळगांव |
शहरात परप्रांतीय तरुणांकडून खोटे रत्न विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे, मात्र आकाशवाणी चौकात विक्रीचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते राहुल पोदार यांनी हाणून पडला. सदर परप्रांतीय तरुणाला प्रश्न विचारले असता उडवा उडविचे उत्तरे दिली. परप्रांतीय तरुण खडे राशिच्या हिशोबाने विकत होता किंमत कमीत कमी ५०० रूपये होती मात्र सदर रत्ने डुप्लिकेट, आर्टिफिशियल होते अशी कबुली त्याने दिली.
रत्न धारण करण्याचे निकष –
ज्योतिष शास्त्रानुसार रत्न धारण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळी रत्ने सांगितली गेली आहेत. व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास करून ज्योतिषी त्यांना विशिष्ट प्रकारचे रत्न धारण करण्याचा सल्ला देतात,मात्र कोणतेही ज्ञान नसताना तरुण विक्री करीत होता.
मात्र अशा वेळी भावनिक न होता सतर्क रहा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राहुल पोदार यांनी केले आहे.
पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्ने म्हणतात. त्यांतल्या ९ मौल्यवान रत्नांना भारतीय ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्नांचा उल्लेख नवरत्ने असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणाऱ्या तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्न वापरण्याचा सल्ला देतात. चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांनाच ज्योतिषी नवग्रह मानतात.

