जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था

आंतर महाविद्यालयीन संविधान पाठांतर स्पर्धा संपन्न

वैष्णवी पाटील आणि कावेरी नेरकर ठरल्या संविधान जागर करंडकाच्या मानकरी

जळगाव |१५ ऑगस्ट २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|

स्वातंत्र्य दिना निमित्त विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान आणि नुतन मराठा महाविद्यालय जळगाव आयोजित का. राजेंद्र भालेराव स्मृती संविधान जागर करंडक आंतर शालेय आणि आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संविधान पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्व स्पर्धक विध्यार्थ्यांना व विध्यार्थ्यांकरवी समाजा मध्ये रुजावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धा नुतन मराठा महाविद्यालयाचा कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आयु. जयसिंग वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ पी. एल. देशमुख सर, श्री विलास यशवंते, कुलदीप भालेराव यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. या कार्यक्रमाला सुश्मिता भालेराव व श्री उदय सपकाळे उपस्थित होते. एकुण पन्नास विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आणि संविधानाने दिलेल्या मानवी मुलभूत अधिकार या विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यात प्रथम पारितोषिक वैष्णवी पाटील, द्वितीय काव्या फेगडे तृतीय काव्या पवार उत्तेजनार्थ दिशा सूर्यवंशी आणि प्रथमेश गौरव या शालेय विद्यार्थ्यांनी पटकावले तर अंतर महाविद्यालयीन गटातून कावेरी नेरकर यांनी प्रथम पारितोषिक मिळवून आलिया बी अमजद यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावलं. या स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक चार वर्षाची प्रेरणा राजेंद्र बावस्कर हिला विशेष पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत सुरवाडे यांनी केले.एकूण चार तास चालणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाऊराव सुरडकर विठ्ठल भालेराव गोपाळ भालेराव प्रबुद्ध भालेराव आणि प्रशांत सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितितांना स्वातंत्र्य दिनाची शपथ देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button