महाराष्ट्रजळगावताज्या बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव | जळगांव लाईव्ह न्यूज|
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 03/03/2025 रोजी सकाळी अकरा वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे. या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी
आपल्या तक्रारी घेऊन
उपस्थित राहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
