संस्थाजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे भव्य आयोजन

सागर पार्क मैदानावर रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम

जळगाव |
भरारी फाउंडेशनतर्फे २३ ते २७ जानेवारी दरम्यान शहरातील सागर पार्क मैदानावर बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे १० वे वर्ष आहे आणि या पर्वाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते होणार आहे.

उद्घाटन समारंभासाठी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, भालचंद्र पाटील, उद्योगपती रजनीकांत कोठारी, डॉ. पी. आर. चौधरी, बाळासाहेब सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमांचे आयोजनः

23 जानेवारी: ‘भारुडं प्रबोधन’, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, जागर लोककला, तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

24 जानेवारीः अभिनेत्री श्रेया बुबडे आणि अभिनेते कुशल बद्रीके यांच्या ‘चला हवा करूया’ कार्यक्रमाचे आयोजन

25 जानेवारीः ‘सप्तरंगी रे’ शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण, तसेच मराठी संस्कृतीवर आधारित फॅशन शो

26 जानेवारी: शाहीर मीरा दळवी यांच्या ‘लावणी महाराष्ट्राची’ कार्यक्रमाचे आयोजन –
27 जानेवारीः शाहीर सुमित दळवी यांचा ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण’ कार्यक्रम

खाद्यपदार्थांची मेजवानी –
महोत्सवाच्या दरम्यान विविध खाद्यपदार्थांची मेजवानी जळगावकर नागरिकांना चाखता येणार आहे. जळगावकरांनी या पाच दिवसीय महोत्सवाला मोठा प्रतिसाद देऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि विविध खाद्यपदार्थांचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या महोत्सवाने सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्यासोबतच जळगाव शहराच्या सांस्कृतिक जीवनात नवा रंग भरला आहे. नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button