संस्थाकरिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

नि प पाटील विद्यालय पळासखेडे (मिराचे) या शाळेतील 1996 बॅच विध्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

माजी विद्यार्थ्यांना सलग पाचव्यांदा स्नेहसंमेलन घेऊन दिला जुन्या आठवणींना उजाळा

पळासखेडे |
नि प पाटील विद्यालय पळासखेडे (मिराचे) या शाळेतील 1996 दहावी मधील विद्यार्थ्यांनी प्रथम स्नेह संमेलन 2018 मध्ये केले यावर्षी सुद्धा त्यांनी सलग पाचवे स्नेहसंमेलन अहिंसा तीर्थ कुसुंबा या ठिकाणी घेतले यामध्ये प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यातीलच विद्यार्थिनी वैशाली सोनवणे यांची निवड करण्यात आली तसेच त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना सुक्त गुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा घेण्यात आल्या संगीत खुर्ची नृत्य गायन शेरोशायरी इ.माध्यमातून विद्यार्थ्यांनी आनंद लुटला शाळेतील विद्यार्थी आज वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्नेहसंमेलन घेण्यास सुरुवात केली हे विद्यार्थी त्यानंतर सातत्याने हा स्नेहा संमेलन घेत आहे स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्यांनी मैत्री फाऊंडेशन स्थापन करून आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी म्हणून सामाजिक कार्य मदत करण्याचे ठरवले होते त्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्य करत आहे त्यांनी जि प कासली या ठिकाणी वाटर फिल्टर दिले तसेच रक्तदान शिबिर घेतले यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून किशोर फकीरा सपकाळे व उपाध्यक्ष म्हणून वैशाली सोनवणे यांची निवड करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली परंतु डॉ संदीप पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले त्या माध्यमातून गोशाळेचा प्रशस्त हॉल व जेवणाची हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सपकाळे यांनी केले प्रास्ताविक प्रा. गजानन देशमुख यांनी केले डॉ प्रफुल पाटील ,डॉ गणेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशा रीतीने अत्यंत आनंदाने कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button