सिद्धिविनायक विद्यालयात साने गुरुजी जयंती दिनानिमित्त अभिवादन

जळगाव|
येथील जुन्या औद्योगिक वसाहत मधील सिद्धिविनायक बालवर्ग, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व इंग्रजी माध्यम विद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी, साहित्यिक व आदर्श शिक्षक साने गुरुजी यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका डॉ. अमृता सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून माल्याअर्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. आर. पी. खोडपे, गुलाब पाटील शिक्षक पालक संघाच्या सदस्या सौ. सुरेखा चव्हाण, सौ. पूनम पाटील, सौ. वैशाली राजपूत, ज्योती शिरसाळे हे उपस्थित होते. विद्यालयातील रोहिणी धांडे यशराज कुंभार, यश थोरात, दिव्या राठोड, हर्षल जाधव, नितीन विश्वकर्मा या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींनी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी स्वावलंबी जीवन कसे जगावे हे गुण विद्यार्थ्यांनी कसे स्वतःमध्ये रुजवावेत याचे अनुभव सांगून जीवनातील आईचे महत्व विशद केलेले साने गुरुजींचे विचार सांगितलेत. क्रीडा शिक्षक श्री अनिल माकडे यांनी बलसागर भारत होवो हे स्फूर्तीदायी गीत विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. के. चौधरी तर प्रास्ताविक श्री संतोष चव्हाण यांनी केले.

