चोपडाजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
शहाणा येथे पीक विमा योजनेबाबत जनजागृती मोहीम

मुबारकपुर, (ता. शहादा) दिनांक ४ जुलै २०२५| खान्देश लाईव्ह न्यूज|
तालुक्यातील शहाणा येथे
तालुका कृषी विभागामार्फत पीक विमा योजनेबाबत बैठक घेऊन जनजागृती करण्यात आली.
सहायक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत असून कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद, मूग, भुईमूग आदी पिकांचा विमा काढण्याचे आवाहन केले. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची व शेतकऱ्यांसाठी शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी उपसरपंच नरेद्र भंडारी, माजी सरपंच जंतर नावडे, ग्रा.पं. सदस्य आकाश भंडारी, राकेश ठाकरे, पदमा सुळे, बलसिंग पावरा, युवराज सुळे, अर्जुन पवार, सोमनाथ जाधव, राकेश ठाकरे, मका तडवी व शेतकरी यांची उपस्थिती होती.

