जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

महापौर दीपमाला काळे यांनी घेतले सुरेशदादा जैन यांचे आशीर्वाद

शहरातील प्रलंबित प्रश्नांवर झाली चर्चा

खान्देश लाईव्ह न्युज | २२ फेब्रुवारी २०२६| मकरंद कुलकर्णी|

जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी रविवारी दुपारी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महापौरांनी सुरेशदादांचे आशीर्वाद घेतले असून, शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

या भेटीत जळगाव शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत सुरेशदादा जैन यांनी मार्गदर्शन केले. प्रामुख्याने शहरातील व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत सुरेशदादांनी महापौरांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.महानगरपालिकेच्या कामकाजात येणारा अडथळा दूर करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

 

या सदिच्छा भेटीच्या वेळी माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, नगरसेवक अमित काळे व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button