जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुविधा सुरू; नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचणार

जळगाव, दि. ५ जानेवारी २०२६| खान्देश लाईव्ह न्यूज|

जळगाव जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने लोकशाही दिनासाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटीत केली आहे.

यापुढे लोकशाही दिनासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांना आपले अर्ज जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या Jalgaon.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत.

लोकशाही दिनासाठी अर्ज ऑनलाईन दाखल करण्याची प्रक्रिया दर महिन्याच्या ०१ तारखेपासून १५ तारखेपर्यंत सुरू राहील. या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील व त्यांचा आढावा पुढील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येईल.

तरी लांबच्या तालुक्यांतून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याऐवजी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button