जळगावताज्या बातम्याराजकारण

ढोल-ताशांच्या गजरात प्रभाग १३ मध्ये सत्यजित पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी विविध कॉलनीत उमेदवारांचा जोरदार संपर्क, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

जळगाव | खान्देश लाईव्ह न्यूज|

जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. सत्यजित पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. संभाजी नगरातील दत्त मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

ढोल-ताशांच्या गजरात आणि महिलांच्या औक्षणाने स्वागत

ढोल-ताशांच्या कडकडाटात प्रचाराला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी सत्यजित पाटील यांनी गोविंदपुरा, आशापूरी परिसरात झंझावाती पदयात्रा काढली. यावेळी परिसरात चैतन्याचे वातावरण दिसून आले. अनेक ठिकाणी गृहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पेढा भरवून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

“ट्रॅक्टर या चिन्हा समोरील बटण दाबून विकासाला साथ द्या,” असे आवाहन मतदारांना केले आहे

जळगाव महानगरपालिकेसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे मुद्दे घेऊन सत्यजित पाटील मैदानात उतरल्याने प्रभाग १३ मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button