जळगाव,भुसावळ येथे ३१ ऑक्टोबर रोजी पदयात्रेचे आयोजन
एक भारत, एकता आणि अभिमानाचा प्रवास
जळगाव, दि. २९ ऑक्टोबर २०२५ |खान्देश लाईव्ह न्युज|
युवक कार्य व क्रीडा मंत्रालयांतर्गत MY Bharat या उपक्रमाद्वारे “Sardar@१५० Unity March” या राष्ट्रव्यापी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून, जळगाव जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर रोजी दोन पदयात्रांचे आयोजन करण्यात आल्या आहेत. पहिली पदयात्रा जळगाव शहरात सकाळी ८ वाजता सरदार पटेल पुतळा, महानगरपालिका जळगाव येथून सुरू होऊन सरदार वल्लभभाई हॉल येथे समारोप होईल. दुसरी पदयात्रा भुसावळ शहरात दुपारी ३:३० वाजता गांधी पुतळा मैदान येथून सुरू होऊन सरदार पटेल पुतळ्याजवळ समाप्त होईल.
या पदयात्रांमध्ये मंत्री, लोक प्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, युवक मंडळे, विविध शैक्षणिक संस्था विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
पदयात्रेसोबतच निबंध, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, स्वदेशी मेळावे, नशामुक्ती व स्वच्छता अभियान यांसारख्या विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती व नोंदणीसाठी MY Bharat https://mybharat.gov.in/pages/unity_march या पोर्टलला भेट देऊन या पदयात्रेत महाविद्यालय विद्यार्थी, नागरिक यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.




