त्रिवेणी संगम संघ ठरला कोळी क्रिकेट लीगचा मानकरी
समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी क्रिकेट स्पर्धा प्रभावी माध्यम : आमदार प्रा.चंद्रकात सोनवणे

जळगाव |१५ डिसेंबर २०२५|
|खान्देश लाईव्ह न्यूज|
कोळी क्रिकेट लीग पर्व सहावे शिवतीर्थ मैदानावर सुरुवात होते. ही स्पर्धा ११ डिसेंबर जानेवारी ते १४ डिसेंबर पर्यंत घेण्यात आली. यात एकूण १४ संघ सहभागी सहभागी होते. सामन्यांची सुरवात महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
या प्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे,शामकांत दादा सोनवणे, डॉ.परिक्षीत बाविस्कर, वृषभ पाटील यांची उपस्थिती लाभली.
अंतिम सामना त्रिवेणी संगम विरुद्ध अरुश्री हॉस्पिटल संघामध्ये झाला. यात त्रिवेणी संगम संघाने प्रथम फलंदाजी करत १०७ धावा केल्यात प्रत्युत्तर अरुश्री हॉस्पिटल यांना १०० धावा पर्यंत मजल मारता आली, त्रिवेणी संगम विजयाचे मानकरी ठरले.तिसऱ्या स्थानी सोनवणे वॉरियर्स,चौथ्या स्थानी संघ हूप पहिलवान संघ मानकरी ठरले,सर्व संघानी चमकदार अशी कामगिरी केली, त्यामुळे अंतिम दिवस लक्षवेधी ठरला.कोळी क्रिकेट लीगला डॉ.शांतारामदादा सोनवणे,माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे,डॉ.किरण सोनवणे,नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे,पवन सोनवणे,डॉ.मनीष चौधरी,हेमेंद्र सपकाळे,यतीन भंगाळे,पवन जैन,जयदीप सोनवणे,सागर प्रल्हाद सोनवणे आदींनी शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खेळाडू सोबत हितगुज साधून कोळी समाजाला एकत्र येण्यासाठी क्रिकेट हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे असे प्रतिपादन करीत आयोजन समितीचे आभार मानले, तसेच महिला संघ सहभागी होत नसल्याची खंतही याप्रसंगी त्यांनी बोलून दाखवली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पो.प्रदीप सपकाळे,पो.विजय सोनवणे,हितेंद्र सपकाळे,संजय जैतकर,जितेंद्र (जॉन) सोनवणे,राजू तायडे,ऋषिकेश सोनवणे,राकेश बाविस्कर,गुणवंत कोळी,अश्विन शंकपाळ,मयूर सपकाळे,अजय सोनवणे तसेच सर्व कमिटी मेंबर आणि पिवळ्या भिंती मधील सर्व कोळी समाज बांधव आदींनी सहकार्य केले.


